Join us
Daily Top 2Weekly Top 5

किली पॉलही म्हणतोय "जय श्री राम"! रामललासाठी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 10:41 IST

किली पॉललाही रामललाची भुरळ, रीलस्टारने बनवलेला व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या सर्वत्र राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेची धामधूम पाहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अवघे काहीच तास शिल्लक राहिलेले असताना संपू्र्ण देशभरात भक्तिमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.  जिकडेतिकडे केवळ राम नामाचा जप आणि जय श्री रामच्या घोषणा ऐकायला मिळत आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा चर्चेचा विषय बनला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. केवळ देशवासीच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही रामललाची भुरळ पडली आहे. 

सोशल मीडिया आणि रील स्टार किली पॉलनेही रामललासाठी खास व्हिडिओ बनवला आहे. बॉलिवूड गाण्यांवर थिरकणारा किली पॉलही रामाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. किली पॉलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने "जय श्री राम" हे गाणंही टाकलं आहे. या गाण्याबरोबरच व्हिडिएओत किली पॉलही जय श्री राम जय श्री राम राजाराम असं म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओला त्याने "जय श्री राम...मला आशीर्वाद द्या" असं कॅप्शन दिलं आहे. किली पॉलचा हा व्हिडिओ पाहून चाहते भारवून गेले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत त्यांनी किली पॉलचं कौतुक केलं आहे. 

किली पॉल हा रील स्टार आहे. तो मुळचा टांझानियाचा आहे. किली पॉल अनेक बॉलिवूड गाण्यांवर व्हिडिओ बनवत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मराठीतील ट्रेंडिंग गाण्यांवरही  व्हिडिओ बनवल्यामुळेही तो चर्चेत आला होता. 

दरम्यान, २२ जानेवारीला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशातील नागरिकही उत्सुक आहेत. अयोध्येतही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. 

टॅग्स :राम मंदिरअयोध्यासेलिब्रिटी