Join us
Daily Top 2Weekly Top 5

भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबातीवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 21:16 IST

ब्लॉकबस्टर हिट ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती याचा या चित्रपटातील अभिनय सगळ्यांनाच सुखावणारा होता. या चित्रपटातील त्याची भूमिका ...

ब्लॉकबस्टर हिट ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती याचा या चित्रपटातील अभिनय सगळ्यांनाच सुखावणारा होता. या चित्रपटातील त्याची भूमिका निगेटीव्ह असली तरी राणाचा अभिनय ठळकपणे डोळ्यात भरला होता. बाहुबली अर्थात प्रभासच्या तोडीस तोड व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. हा राणा अचानक आठवण्यामागे कारण म्हणजे, त्याच्याबद्दलच्या काही बातम्या. होय, सध्या राणाच्या आरोग्याला धरून काही वेगळ्याच बातम्या कानावर येत आहेत. राणावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. राणाचे तमाम चाहते यामुळे चिंतेत असताना आता खुद्द राणानेचं याबद्दल खुलासा केला आहे. होय, रविवारी राणाने आपल्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. ‘मी आपल्या आरोग्याबाबत वेगवेगळ्या विचित्र चर्चा ऐकतोय. मी ठीक आहे, मित्रांनो़ फक्त काही बीपीसंदर्भातील तक्रारी आहेत. चिंता आणि प्रेम यासाठी आभाऱ पण कृपया अफवा पसरवू नका. हे माझे आरोग्य आहे, तुमचे नाही,’ असे राणाने स्पष्ट केले आहे.ALSO READ : राणा दग्गुबातीचा हा नवा लुक पाहाच !एकंदर काय तर राणावर कुठल्याही प्रकारणी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली नाही. याबाबतच्या चर्चा शुद्ध अफवा आहेत, हे सिद्ध झाले आहे. साहजिकच राणाच्या चाहत्यांसाठी ही समाधानकारक बातमी आहे. राणा दग्गुबाती लवकरच हाथी मेरे साथी चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु सोलोमन करत आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग थायलँडला झाली आहे. 2018 च्या दिवाळीच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दम मारो दम, डिपार्टमेंट आणि बेबीसारख्या चित्रपटांमध्ये  राणाने भूमिका केली आहे. राणा दग्गुबाती हॉलिवूडमधील सायन्स फिक्शन सिरीज ‘स्टार वार्स’चे निर्माता जॉज लुकास आपले प्रेरणास्थान मानतो. त्याचे घर पाहण्याची राणाची फार इच्छा आहे.