Join us

कमी बजेटमुळे कियारा आडवणीने नाकारला कबीर सिंगच्या दिग्दर्शकाचा आगामी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 16:53 IST

कबीर सिंगसारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर कियारा मागे वळून पाहिलं नाही.

बॉलिवूडमध्ये कियारा आडवणीने खूप कमी वेळात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कबीर सिंगसारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर कियारा मागे वळून पाहिलं नाही. यानंतर कियाराला अनेक मोठ्या सिनेमांच्या ऑफर मिळाल्या. 'गुड न्यूज' आणि 'लक्ष्मी बॉम्ब' सारखा सिनेमात तिने काम केलं आहे. कबीर सिंग हा सिनेमा तिच्या करिअरमधला टर्निंग पाईंट ठरला. 

'कबीर सिंह' सिनेमाचे दिग्दर्शन मुराद खेतानी यांनी केले आहे. खेतानी ‘अपूर्व’ नावाचा पुढचा सिनेमा तयार करणार आहेत. त्यांनी कियारा आडवाणीला या सिनेमाच काम करण्याची ऑफर दिली होती, परंतु तिने यात काम करण्यास नकार दिला. या सिनेमाचे बजेट खूप कमी असल्याने त्यानी नकार दिल्याची माहिती आहे. 

न्यूज 18च्या रिपोर्टनुसार,  कियाराची टीमचे म्हणणे आहे की,  सध्या कियाराकडे बर्‍याच मोठ्या बजेटचे चित्रपट आहेत. यामुळे तिचे शेड्यूल खूप बिझी आहे.  त्यामुळे ती कमी बजेटच्या चित्रपटासाठी वेळ देऊ शकणार नाही. तिच्या टीमच्या सांगण्यावरून अभिनेत्रीने मुराद खेतानी यांच्या नव्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

कियारा 'शेरशाह'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय कियारा  जुग जुग जियोमध्ये सुद्धा झळकणार आहे. यात ती वरूण धवनसोबत दिसणार आहे.

टॅग्स :कियारा अडवाणी