बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री आणि तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra)ने २८ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून खुशखबरी दिली आहे. त्यानंतर अभिनेत्री सातत्याने चर्चेत येत आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. तिने प्रेग्नेंसीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. एका सिनेमात तिने काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करत आहे. हा चित्रपट म्हणजे डॉन ३ (Don 3 Movie). या चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार होती.
फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन ३ची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी सिनेमात कियारा आडवाणी मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार होती. पण आता तिने सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. तिने काही काळ सिनेमापासून दूर राहत प्रेग्नेंसीवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप या वृत्ताला कियारा किंवा निर्मात्यांकडून दुजोरा मिळालेला नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियाराने निर्मात्यांसोबत चर्चा केल्यानंतर ती सिनेमातून बाहेर पडली आहे.
या कारणामुळे अभिनेत्री सिनेमातून पडली बाहेर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा निर्मात्यांशी बोलल्यानंतर परस्पर संमतीने चित्रपटापासून विभक्त झाली आहे, याचा अर्थ असा आहे की अभिनेत्री तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. तिला तिच्या आयुष्यातील हा सुंदर आणि महत्त्वाचा टप्पा कोणत्याही तणावाशिवाय एन्जॉय करायचा आहे. मात्र, अभिनेत्री सध्या यश स्टारर 'टॉक्सिक' आणि 'वॉर २'च्या शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांना दिली खुशखबर
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी २८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पालक होणार असल्याची घोषणा केली. या जोडप्याने हातात बाळाचे मोजे धरलेले एक फोटो शेअर केले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे.' ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहते खूश झाले आहेत.