कियारा अडवाणी सध्या बॉलिवूडची फेवरेट बनली आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर कियाराची ‘लस्ट स्टोरिज’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती. ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. तेव्हापासून आता कियारा बॉलिवूडमधील अनेकींना टक्कर देताना दिसतेय. होय, दिशा पाटनीच्या हातचा एक मोठा प्रोजेक्ट कियाराने हिसकावला आहे. डिएनएने दिलेल्या वृत्तानुसार, कियाराने दिशाकडून एका मोठ्या ब्रँडची जाहिरात हिसकावून घेतली आहे. दिशा आधीपासून या ब्रँडशी जुळलेली होती आणि या ब्रँडची टेलकम पावडर प्रमोट करत होती. पण दिशा असतानांच या ब्रँडने कियाराला घेतले. या ब्रँडचे फेस वॉश, सीरम आणि बॉडी लोशन रेंज कियारा प्रमोट करू लागली. यादरम्यान दिशाचा करार संपला. पण ब्रँडने या कराराचे नुतनीकरण करण्याऐवजी दिशाच्या जागी कियाराला साईन केले.
कियारा अडवाणीने दिशा पाटनीकडून हिसकावला हा मोठा प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 16:29 IST
कियारा अडवाणी सध्या बॉलिवूडची फेवरेट बनली आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर कियाराची ‘लस्ट स्टोरिज’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती. ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. तेव्हापासून आता कियारा बॉलिवूडमधील अनेकींना टक्कर देताना दिसतेय.
कियारा अडवाणीने दिशा पाटनीकडून हिसकावला हा मोठा प्रोजेक्ट
ठळक मुद्देहोय, दिशा पाटनीच्या हातचा एक मोठा प्रोजेक्ट कियाराने हिसकावला आहे.