Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून...लाज वाटत नाही का? कियाराचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 10:47 IST

तूर्तास काय तर कियारा ट्रोल होतेय. कारण काय तर तिचा एक व्हिडीओ. होय, हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि कियाराला नेटक-यांनी ट्रोल करायला सुरूवात केली.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कियाराकडे सध्या अनेक सिनेमे आहेत. शेरशाह, भुल भुलैय्या 2, जुग जुग जियो या सिनेमात ती झळकणार आहे. शशांक खेतानचा एक सिनेमाही तिनं साईन केला आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी ( Kiara Advani)आताश: मोठी स्टार झाली आहे. नुकतीच तिनं इंडस्ट्रीत  7 वर्ष पूर्ण केलीत. याचं झक्कास सेलिब्रेशनही झालं. तूर्तास काय तर कियारा ट्रोल होतेय. कारण काय तर तिचा एक व्हिडीओ. होय, हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि कियाराला नेटक-यांनी ट्रोल करायला सुरूवात केली. ( Kiara Advani trolled)तर  कियारा अलीकडे तिचा कथित बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी पोहोचली. याचाच व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओत ती कारमधून उतरताना दिसतेय. कियारा कारमधून उतरली आणि एक वयोवृद्ध गार्ड समोर आला. त्यानं कियाराच्या कारचं दार उघडलं. शिवाय तिला सलामही ठोकला. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडीओ शेअर केला आणि तो पाहून नेटकरी संतापले. तू तुझ्या गाडीचं दार स्वत: उघडू शकत नाही का? असा सवाल करत नेटक-यांनी कियाराला फैलावर घेतलं.

त्या बिचा-याचं वय बघ. तू स्वत: गाडीचं दार उघडू शकत नाही का? असं एका युजरनं लिहिलं. एका युजरनं तर चक्क कियाराची लाज काढली. वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम घेतेस, लाज वाटत नाही का? अशी कमेंट या युजरनं केली. अशा माज आलेल्यांचे चित्रपटच बॅन करायला हवेत, अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरनं दिली. एका युजरनं  शेम ऑन यू म्हणत आपला संताप व्यक्त केला. एकंदर काय, एका वयोवृद्ध गार्डचा सलाम घेणे कियाराला चांगलंच महाग पडलं.कियाराचं म्हणाल तर, गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या व सिद्धार्थ मल्होत्राच्या अफेअरच्या चर्चा आहेत. अद्याप दोघांनीही याची कबुली दिलेली नाही. पण कियारा सर्रास सिद्धार्थच्या घरी जाते. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कियाराकडे सध्या अनेक सिनेमे आहेत. शेरशाह, भुल भुलैय्या 2, जुग जुग जियो या सिनेमात ती झळकणार आहे. शशांक खेतानचा एक सिनेमाही तिनं साईन केला आहे.

  

टॅग्स :कियारा अडवाणी