Join us

कियारा आडवाणीनं आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'साठी दिलं होतं ऑडिशन, म्हणाली-त्यावेळी मला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:24 IST

कियाराने स्वत: हा खुलासा केला कि, तिने आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.

कियारा अडवाणी सध्या तिच्या 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे  कौतुक होत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला की, तिने आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते, परंतु तिला भूमिका मिळाली नाही. तिने अनेक वर्षांपूर्वी आमिर खानच्या चित्रपटातील करीना कपूरच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. 

2022 सालचा चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा' हा आमिर खानचा कमबॅक चित्रपट होता, ज्यामध्ये करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटासाठी करिनाने ऑडिशन दिले होते. मात्र, करीनाच नाही तर कियारानेसुद्धा चित्रपटासाठी ऑडिशन दिले, पण तिला नकार मिळाला.

एका मुलाखतीत  कियारा म्हणाली, तिला आधी माहित नव्हते की ती या चित्रपटासाठी ऑडिशन देत आहे. जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, तिने करिनासारख्या कोणत्याही चित्रपटासाठी ऑडिशन दिले आहे का? यावर कियारा म्हणाली, "होय, नक्कीच. मी 'लाल सिंग चड्ढा' साठी ऑडिशन देखील दिले होते. त्यावेळी मला माहिती नव्हते की ते लाल सिंग चड्ढा साठी आहे. मला ते ऑडिशन पुन्हा बघायचे नाही, ते भयानक असेल. ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे."

गेल्या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा 'लाल सिंह चढ्ढा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. रिपोर्ट्नुसार, 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट केवळ 130 कोटी कमवू शकला. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाच्या कमाईवर वाईट परिणाम झाला.

कियारा अडवाणीचा नुकताच रिलीज झालेला 'सत्यप्रेम की कथा' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पुन्हा एकदा तिची कार्तिक आर्यनसोबतची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. आता लवकरच कियारा 'वॉर 2', 'गेम चेंजर' आणि 'अदल बादल'मध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणीआमिर खानकरिना कपूर