Join us
Daily Top 2Weekly Top 5

'टॉक्झिक'मधील इंटिमेट सीन कमी करण्याची मागणी, कियारा अडवाणीने चर्चांवर दिलं उत्तर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:56 IST

'टॉक्झिक'च्या 'त्या' चर्चांवर काय म्हणाली कियारा अडवाणी?

यश आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'टॉक्सिक' हा चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. सिनेमाची रिलीज डेट सतत पुढे ढकलली जात आहे. अलिकडेच या चित्रपटातील काही इंटिमेट दृश्ये कमी करण्याची मागणी केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर कियाराने स्वतः समोर येत या सर्व अफवांवर मौन सोडले असून सत्य परिस्थिती स्पष्ट केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती पोस्ट आपल्या स्टोरीवर शेअर करत कियाराने हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. 'निव्वळ मूर्खपणा' असं तिने लिहिलं. तिच्या या प्रतिक्रियेमुळे चित्रपटातील सीन्सवरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, कियाराने एका इंटिमेट सीनचे शूटिंग पूर्ण केले होते, मात्र अंतिम व्हर्जन पाहिल्यानंतर तिने दिग्दर्शिका गीता मोहनदास आणि यश यांच्याकडे तो सीन छोटा करण्याची गळ घातली. मात्र, कियाराने या सर्व बातम्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

'टॉक्सिक' हा एक गँगस्टर ड्रामा असून गीता मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार यश दुहेरी भूमिकेत दिसणार असून कियारा 'नादिया' नावाचे पात्र साकारत आहे. या चित्रपटात नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची घोषणा २०२३ मध्ये करण्यात आली होती आणि २०२५ पर्यंत याचे शूटिंग पूर्ण झाले होते.

हा चित्रपट सुरुवातीला मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार होता. 'धुरंधर'शी सिनेमाची टक्कर होणार होती. परंतु काही कारणास्तव त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर निर्मात्यांनी ४ जून ही तारीख जाहीर केली होती, पण आता पुन्हा एकदा चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kiara Advani Denies 'Toxic' Intimate Scene Cut Request Rumors.

Web Summary : Kiara Advani refuted rumors of requesting intimate scenes be cut from 'Toxic,' starring Yash. She dismissed reports claiming she asked for scene reduction after viewing the final version as 'utter nonsense,' clarifying the situation.
टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडयशTollywood