Join us

OMG ! अर्जुन रेड्डीला भेटायला गेली कबीर सिंगची गर्लफ्रेंड प्रिती, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:49 IST

नुकतेच कियारा अडवाणी व विजय देवरकोंडा एकत्र स्पॉट झाले.

तेलगू सुपरहिट चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक कबीर सिंग चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिका साकारली होती. तर या चित्रपटामुळे अर्जुन रेड्डी या भूमिकेमुळे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासुद्धा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला. आता नुकतेच कियारा व विजय देवरकोंडा एकत्र स्पॉट झाले. ते दोघं एका शूटच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

मुंबईत एका शूटसाठी विजय व कियारा एकत्र आले होते. यावेळी दोघेही पारंपरिक गेटअपमध्ये पाहायला मिळाले.

विजयनं निळ्या रंगाचा कुर्ता व सोनेरी रंगाची धोती परिधान केली होती. तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता. कियारा व विजय या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली आहे. कबीर सिंग प्रदर्शित झाल्यानंतर विजयने तिच्यासाठी भेटवस्तू व पुष्पगुच्छ पाठवून तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

विजयचा ‘डिअर कॉमरेड हा तेलुगू चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

तर कबीर सिंगनंतर कियाराकडे बरेच प्रोजेक्ट आहेत.

त्यात लक्ष्मी बॉम्ब, शेरशाह, गुड न्यूज, इंदू की जवानी या सिनेमांचा समावेश आहे.

टॅग्स :कियारा अडवाणीविजय देवरकोंडा