Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kiara Advani-Sidharth Malhotra Wedding: सिड-कियाराच्या लग्नात मोठा बदल, 6 फेब्रुवारीला होणार नाही लग्न; वाचा, कधी होणार 'सात फेरे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:40 IST

प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी करण जोहरसह अनेक सेलिब्रिटी सूर्यगढ पॅलेसमध्ये उपस्थित होते, मात्र याचदरम्यान एक मोठा खुलासा समोर आला आहे. सिड-कियाराचं लग्न ६ फेब्रुवारीला होणार नाही.

Kiara Advani-Sidharth Malhotra Wedding Date Update: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुम्हीही जर या कपलच्या लग्नाची वाट पाहत असाल तर थोडा वेळ आणखी थांबावं लागेल, कारण नवीन माहितीनुसार कियारा आणि सिद्धार्थचे लग्न 6 फेब्रुवारीला होणार नाही. सिद्धार्थ आणि कियारा कोणत्या दिवशी सात फेरे घेणार? जाणून घेऊया.

कधी होणार सिद्धार्थ-कियाराचं लग्न?तुम्ही आतापर्यंत वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. मात्र लेटेस्ट रिपोर्टनुसार, कियारा आणि सिद्धार्थ ६ फेब्रुवारीला नाही तर ७ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. ७ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा होणार आहे. लग्नानंतर हे कपल त्याच दिवशी एक ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. 

आज लागणार कियाराच्या हातावर मेहंदीसिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या नव्या तारखेसोबतच त्यांच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूलही समोर आले आहे. लव्ह बर्ड्स सिद्धार्थ आणि कियारा यांचा मेहंदी सोहळा आज होणार आहे. कियाराच्या हातावर आज सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाची मेहेंदी लागणार आहे. 

राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित होणार्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर राहणार आहेत. करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांसह अनेक कलाकार जैसरमेरला पोहोचले आहेत. 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा