Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर दिसण्यासाठी खुशी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी, स्वत:च केला खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 11:06 IST

खुशीचा श्रीदेवीबरोबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत खुशीने प्लास्टिक सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे.

जान्हवी कपूर पाठोपाठ श्रीदेवीची लेक खुशी कपूरनेही अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. द आर्चीज या सिनेमातून खुशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. सध्या खुशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवरुन खुशीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी प्लास्टिक सर्जरी केल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 

खुशीचा श्रीदेवीबरोबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका इव्हेंटमधील हा व्हिडिओ आहे. यामध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्याबरोबर खुशीदेखील दिसत आहे. खुशीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओवर चाहत्याने कमेंट केली आहे. "खरं सांगू का खुशी आधीसारखीच आताही दिसत आहे. तिने वजन केल्यामुळे ती अशी दिसत आहे", अशी कमेंट चाहत्याने केली आहे. या कमेंटवर खुशी कपूरने रिप्लाय करत प्लास्टिक सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. 

खुशीने या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "लिप फिलर आणि नाक", असं म्हणत खुशीने प्लास्टिक सर्जरी केल्याचं म्हटलं आहे. अनेक सेलिब्रिटी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात. पण, उघडपणे याबाबत कोणी बोलताना दिसत नाही. खुशीने मात्र सर्वांसमोरच प्लास्टिक सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. 

सध्या खुशी तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. खुशीचं नाव वेदांग रैनाशी जोडलं जात आहे. वेदांग आणि खुशी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. द आर्चीज सिनेमात या दोघांनी एकत्र काम केलं होतं.  दरम्यान, खुशी नादानिया या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :खुशी कपूरसेलिब्रिटीश्रीदेवी