Join us
Daily Top 2Weekly Top 5

या गाण्याने उडवली सा-यांची झोप,आत्तापर्यंत तब्बल १० कोटी लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 12:02 IST

खेसारी लाल यादवला 'मेहंदी लगा के रखना' 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी खेसारीला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला होता. 

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खेसारीलाल यादवचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. एक उत्तम गायक होण्याशिवाय तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमुळे आणि सुपरहिट चित्रपटांमुळे तो भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी बनला आहे. भोजपुरी चाहते त्यांच्या कोणत्याही गाण्याची किंवा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. आता खेसारीचे आणखी एक गाणे चाहत्यांमध्ये हिट ठरले आहे.

 

केसरी आणि काजल राघवानी यांच्या 'मेहंदी लगा के रखना' या गाण्यातील 'कावल देवता के गढ़ल सदलल कैसे' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.लोकं स्वतहून सर्च करत हे गाणे पाहत आहे. या गाण्याने  सा-याच भोजपुरी गाण्याचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. कारण एक नाही, दोन नाही तर १० कोटी लोकांनी आतापर्यंत हे गाणे पाहिले आहे.

हे गाणे स्वत: खेसारीलालनेच गायले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक हिट ठरलेल्या गाण्याच्या यादीत या गाण्याची एंट्री झाली आहे.  हे एक  रोमँटिक गाणे असून श्याम देहाती यांनी लिहिले आहे, तर रजनीश मिश्राने या गाण्याला संगीत दिले आहे. 

खेसारी आणि काजलची जोडी भोजपुरी इंडस्ट्रीत सर्वाधिक सुपरहिट ऑन स्क्रीन जोडी मानली जाते. 'मेहंदी लगा के रखना' 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी खेसारीला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला होता. 

यापूर्वीही खेसारीची वेगवेगळी गाणी प्रेक्षकांमध्ये बरीच हिट ठरली आहेत. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग आणि मोनालिसासोबतची त्याची केमिस्ट्रीने सा-यांची पसंती मिळवली होती.

खेजारीलाल यादव यांनी 'साजन चले ससुराल' सह भोजपुरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या सिनेमाने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज तो भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.