Join us

KGF2 रॉकी भाई बॉक्स ऑफिसवर सुसाट, ठरला हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणार दुसरा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 18:29 IST

सुपरस्टार यशच्या KGF2 चित्रपटानं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. केजीएफ २ चित्रपटाचे ओटीटी राइट्स ३२० कोटींना विकले गेले आहेत

दिग्दर्शक प्रशांत नील यांचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमानं जगभर धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार यशच्या या चित्रपटानं 1000 कोटींवर कमाई करत अनेक विक्रमांवर नाव कोरलं आहे. अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ‘केजीएफ 2’ हा 1000 कोटींवर कमाई करणारा चौथा भारतीय सिनेमा आहे.  जगभर 1000 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवल्यानंतर ‘केजीएफ 2’ हा कन्नड सिनेइंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. अगदी या चित्रपटाच्या कमाईच्या जवळपास एकही कन्नड सिनेमा नाही. . KGF 2 हिंदी सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.

पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा: कन्नड सिनेमाच्या हिंदी डब व्हर्जनला पहिल्यांदाच इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेंड एक्सपर्ट कोमल नाहटा यांनी माहिती दिली की, 'केजीएफ चॅप्टर 2 च्या हिंदी व्हर्जनचे  21 दिवसांचे कलेक्शन 391.65 कोटी रुपये आहे. 'दंगल'चे  कलेक्शन 387 कोटी रुपये होते. अशाप्रकारे, KGF Chapter 2 ची हिंदी व्हर्जन सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. दंगल तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केजीएफ २ चित्रपटाचे ओटीटी राइट्स ३२० कोटींना विकले गेले आहेत. हा चित्रपट २७ मे नंतर ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना रुपेरी पडद्यावर रॉकी भाईचा जलवा पाहिल्यानंतर आता छोट्या स्क्रीनवर पुन्हा या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.

टॅग्स :केजीएफयश