Join us
Daily Top 2Weekly Top 5

फरहान अख्तरच्या कंपनीने खरेदी केले ‘केजीएफ 2’चे हिंदी राईट्स, मोजले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 17:32 IST

फरहान अख्तरच्या कंपनीनेच ‘केजीएफ 1’चे राईट्स खरेदी केले होते.

ठळक मुद्दे‘केजीएफ 1’ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता.

यंदा प्रदर्शित होणा-या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाचे नाव काय तर ‘केजीएफ 2’. आता या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनबद्दल ताजी माहिती समोर येतेय. होय, फरहान अख्तर व रितेश सिधवानीची कंपनी एक्सल एंटरटेनमेंटने ‘केजीएफ 2’चे हिंदी राईट्स 90 कोटी रूपयांत खरेदी केले असल्याचे कळतेय.2018 मध्ये ‘केजीएफ 1’चे राईट्सही याच कंपनीने खरेदी केले होते. ‘केजीएफ 1’ बनला त्यावेळी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनबद्दल विचार केला नव्हता. त्यामुळे अगदी अखेरच्या वेळी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनचे राईट्स एक्सल एंटरटेनमेंटला कवडीमोल भावात मिळाले होते. हे राईट्स एक्सेलने केवळ 43.9 कोटीत खरेदी केले होते. पण आता परिस्थिती बदललीये. ‘केजीएफ 2’चा बजेट वाढला आहे. पहिल्या पार्टच्या तुलनेत दुस-या पार्टवर 7 पट अधिक पैसा लागला आहे. त्यामुळे ‘केजीएफ 2’चे राईट्स खरेदी करण्यासाठी यावेळी एक्सेलला 90 कोटी मोजावे लागले.

प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘केजीएफ 2’मध्ये साऊथ सुपरस्टार यश लीड भूमिकेत आहे. याशिवाय संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संजय या सिनेमात अधीराची भूमिका साकारणार आहे.‘केजीएफ 1’ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता. ‘केजीएफ 2’ याचाच सीक्वल आहे. ‘केजीएफ 1’ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे ‘केजीएफ 2’ची कथा सुरु होत आहे.  हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

टॅग्स :केजीएफ