केजरीवाल यांनी सहकाºयांसोबत पाहिला ‘नीरजा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 00:27 IST
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया,कुमार विश्वास आणि संगीतकार शेखर रावजियानी यांच्यासोबत सोनम कपूर अभिनित नीरजा चित्रपट पाहिला.
केजरीवाल यांनी सहकाºयांसोबत पाहिला ‘नीरजा’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास आणि संगीतकार शेखर रावजियानी यांच्यासोबत सोनम कपूर अभिनित नीरजा चित्रपट पाहिला. चित्रपट विभागाच्या सभागृहात बुधवारी (दि. १७) विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. नीरजा भनोत हिने प्राणाची पर्वा न करता अतिरेक्यांशी लढा दिला. तिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट असल्याने केजरीवाल यांनी हा चित्रपट पाहिला. अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या एएम फ्लाईट ७३ या विमानातील प्रवाशांना वाचवताना नीरजाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या चित्रपटाचे दिग्दर्शक राम माधवानी आहेत.यात सोनम कपूरसोबत ख्यातनाम अभिनेत्री शबाना आझमी यांनी नीरजाच्या आईची भूमिका केली आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि ब्लिंग अनप्लग्ड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.