Join us

‘केदारनाथ’चा टीजर सोशल मीडियावर सुपरडुपर हिट! तुम्हीही पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 14:30 IST

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. आम्ही साराच्या कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘केदारनाथ’बद्दल.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. आम्ही साराच्या कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘केदारनाथ’बद्दल. ‘केदारनाथ’चा टीजर नुकताच रिलीज झाला. सन २०१३ मध्ये उत्तराखंडातील महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित या प्रेमकथेत सारा व सुशांत सिंग राजपूत यांची केमिस्ट्री अफलातून जमून आलीय. चित्रपटाचा टीजर अंगावर काटा उभा करतो. अगदी तसाच सारा व सुशांतच्या प्रेमकथेने अंगावर रोमांच उभे करतो. आपल्या या पहिल्याच चित्रपटात सारा लिपलॉक सीनही देताना दिसणार आहे. टीजरमध्ये याची एक झलकही पाहायला मिळते.

सोशल मीडियावर ‘केदारनाथ’चा टीजर सुपरडुपर हिट झाला आहे. लोक या टीजरच्या प्रेमात पडले आहेत. सारा आणि सुशांतची टीजरमधील केमिस्ट्री पाहून लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘केदारनाथ’चित्रपटात सारा आणि सुशांतची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत पिट्टूची तर सारा मुक्कू नामक पर्यटकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

‘केदारनाथ’ या चित्रपटाने सुरूवातीला बरेच वाद ओढवून घेतले. निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यातील वाद कोर्टापर्यंत पोहोचला. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होत. शूटिंग सुरू असतानाच प्रेरणाने निर्मितीतून माघार घेतल्याने अभिषेकसमोर मोठा पेच उभा राहिला होता. अखेर रॉनी स्क्रूवालाने निर्मितीची जबाबदारी स्विकारली आणि ‘केदारनाथ’चा मार्ग सुकर झाला. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

टॅग्स :सारा अली खानसुशांत सिंग रजपूत