Join us

​कॅटरिनाने शाहरूखच्या घरी घालवली रात्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 17:59 IST

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्याने कॅटरिना कैफ सध्या सैरभैर झाली आहे. यात अलीकडचे तिचे चित्रपटही आपटले. यामुळे कॅट सध्या निराश ...

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्याने कॅटरिना कैफ सध्या सैरभैर झाली आहे. यात अलीकडचे तिचे चित्रपटही आपटले. यामुळे कॅट सध्या निराश झालीय. अशात कुणाचातरी आधार शोधणे साहजिकच आहे. निराश व दु:खी कॅट काल रात्री साडे दहा वाजता शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली. शाहरूखची पत्नी गौरी सध्या लंडनमध्ये असल्याची खबर आहे. एका आॅनलाईन पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार, साडे दहा वाजता शाहरूखच्या घरी पोहोचलेली कॅट पहाटे चार वाजता परत गेली. तिला मागच्या दरवाजाने गूपचूप बाहेर काढण्यात आले. शाहरूख आनंद एल रायच्या नव्या सिनेमात दिसणार आहे. शाहरूखचे नाव यासाठी फायनल झाले आहे. आनंदने या चित्रपटासाठी कॅटरिनाला आॅफर दिल्याचे कळते. आता कॅटरिना व शाहरूखची भेट यासाठी होती की आणखी कशासाठी, हे तेच जाणोत!!