Join us

कॅटरिना-सिद्धार्थचा थायलंडमध्ये रोमान्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 16:05 IST

 ‘काला चश्मा’ गाण्यावर सर्व तरूणाईला थिरकायला लावणारे कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या थायलंडमध्ये रोमान्स करतांना दिसत आहेत. ...

 ‘काला चश्मा’ गाण्यावर सर्व तरूणाईला थिरकायला लावणारे कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या थायलंडमध्ये रोमान्स करतांना दिसत आहेत. चित्रपटातील आगामी गाणे ‘सौ आसमान’ या हनीमून सिक्वेन्ससाठी थायलंडमध्ये शूटींग करत आहेत.त्यांच्या गाण्याबद्दल सांगताना सिद्धार्थ म्हणतो,‘कधीकधी तुम्हाला उगाचच एक पॉझिटिव्हिटी मिळत असते. दहा लोक शेजारी असतानाही एकाच व्यक्तीवरच तुमचा सर्व विश्वास असतो.’ ‘ सौ आसमान को और दो जहाँ को छोड के आयी तेरे पास’ या गाण्याचे शूटींग तिथे होत आहे.अमाल मलिकने हे गाणे संगीतबद्ध केले असून नित्या मेहरा ते तिला हवे तसे सादर करणार असल्याचे कळते आहे. अमित त्रिवेदी हे गाणे संगीतबद्ध करणार होते पण नंतर अमाल मलिकनेच गाणे पूर्ण केले.