Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive : बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण करतेय डेब्यू , सलमान खानच्या घरातील 'या' सदस्यासोबत

By गीतांजली | Updated: August 3, 2019 06:00 IST

गेल्या अनेक दिवसांपासून इसाबेलच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. मात्र तिच्या बॉलिवूड डेब्यूला मुहूर्त सापडत नव्हता अखेर तो सापडला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून  इसाबेल कैफच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. मात्र तिच्या बॉलिवूड डेब्यूला मुहूर्त सापडत नव्हता अखेर तो सापडला आहे. इसाबेल ही बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफची बहीण आहे. इसाबेल सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत क्वथा सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमाचे दिग्दर्शन करण भुतानी करणार आहे.

सप्टेंबरमध्ये हा सिनेमा फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे. या सिनेमाचे शूटिंग मणिपूरमध्ये होणार आहे. हा सिनेमा आर्मीतील सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष शर्माने लवरात्री सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते मात्र त्याच्या या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश लाभले नाही. त्यामुळे या सिनेमाकडून आयुषला अनेक अपेक्षा असणार आहेत.  

आयुष शर्मा यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी  गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिकेसाठी  तो मेहनत करतोय. आयुष दिवसातील २-३ तास व्यायाम करत आहे. आयुष हा टायगर श्रॉफचे ट्रेनर असलेल्या विक्रम स्वैनकडून ट्रेनिंग घेणार आहे. 

याआधी इसाबेल ‘टाईम टू डान्स’ या सिनेमातून डेब्यू करणार अशी चर्चा होती. चित्रपटात इसाबेल बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात. सलमानने मेकर्सला या चित्रपटाचा एक मोठा भाग नव्याने शूट करण्याचे आदेश दिलेत. चित्रपटाची कथा ज्यापद्धतीने पडद्यावर रेखाटली गेली, ती सलमानला आवडली नसल्याची माहिती होती. कदाचित याचमुळे इसाबेलचा डेब्यू रखडला होता.  

टॅग्स :इसाबेल कैफकतरिना कैफसलमान खान