Join us

कॅटरिना कैफची बहीण इसाबेलाला मिळाला ब्रेक; सलमान खानने केले अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 20:20 IST

कॅटरिना कैफची बहीण इसाबेला हिला अखेर ब्रेक मिळाला असून, आता ती बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचेच दिसून येत आहे.

आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अन् बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ हिची बहीण इसाबेला हिला अखेर ब्रेक मिळाला. गेल्या काही दिवसांपासून इसाबेला बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचबरोबर सलमान खान तिला लॉन्च करणार असल्याचे बोलले जात होते. अखेर इसाबेलाने त्यादृष्टीने एक पाऊल टाकले असून, आता ती बॉलिवूड डेब्यूपासून काही अंतर दूर आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. दरम्यान, इसाबेला लॅक्मेचा नवा चेहरा बनली आहे. भारतात या पॉप्युलर ब्रॅण्डचा आतापर्यंत कॅटरिना कैफ, श्रद्धा कपूर आणि करिना कपूर-खान भाग बनले आहेत. आता या ब्रॅण्ड इसाबेलाला संधी दिली असून, ती आता आपले जलवे दाखविताना दिसणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: सलमान खाननेच इशाबेलाचे अभिनंदन करताना तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच इसाबेलाच्या निवडीमुळे तो खूश असल्याचेही त्याने अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.  दरम्यान, इसाबेला या अगोदर २०१४ ला बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी आली होती. परंतु त्यावेळी तिला यश मिळाले नव्हते. आता तिने पुन्हा एकदा बॉलिवूडच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली असून, त्यात ती काहीशी यशस्वी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच इसाबेला बहीण कॅटरिना कैफसोबत अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत बघावयास मिळाली होती. यावेळी तिने कॅमेºयाला पोझही दिल्या होत्या. दरम्यान, इसाबेलाला मिळालेल्या या ब्रेकमागे भाईजान सलमान खानचा तर हात नाही ना? अशी चर्चा आता बी-टाउनमध्ये रंगली आहे.