कॅटरिना कैफचा असाही तोरा; म्हणे, दीपिकासोबत मी कम्फर्टेबल नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 15:36 IST
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यातील पर्सनल कोल्ड वॉर आता प्रोफेशनल लाईफमध्येही दिसू लागले आहे. अलीकडे कॅट व ...
कॅटरिना कैफचा असाही तोरा; म्हणे, दीपिकासोबत मी कम्फर्टेबल नाही!
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यातील पर्सनल कोल्ड वॉर आता प्रोफेशनल लाईफमध्येही दिसू लागले आहे. अलीकडे कॅट व दीपिका दोघीही सगळे काही विसरून दिग्दर्शक आनंद एल रायच्या चित्रपटात एकत्र येणार, अशी चर्चा होती. पण आता एक आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आहे. होय, आनंद एल राय दिग्दर्शित आणि शाहरूख खान स्टारर ‘द ड्वार्फ’ नामक या चित्रपटातून दीपिका आऊट होणार असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे कॅटरिनाच्या म्हणण्यावरून हे सगळे होणार आहे. सूत्रांच्या मते, दीपिकाला या चित्रपटातून कॅटची ब्रेस्ट फे्रन्ड रिप्लेस करू शकते. या चित्रपटात कॅट व दीपिका यांचे नाव फायनल झाले होते. पण आता मी दीपिकासोबत कम्फर्टेबल नाही, असे कॅट म्हणते आहे. खरे तर दीपिकाचे नाव या चित्रपटासाठी फार पूर्वीच निश्चित झाले होते. याऊलट कॅटने यासाठी होकार द्यायला बराच वेळ घेतला. पण आता मी दीपिकासोबत काम करू शकणार नाही,असे तुणतुणे वाजवायला कॅटने सुरुवात केलीय. कॅटने आपले, मत अनुष्का शर्माच्या पारड्यात टाकल्याचेही कळतेय. त्यामुळे दीपिकाच्या जागी या चित्रपटात अनुष्काची वर्णी लागू शकते. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.दीपिका व रणबीर कपूर या दोघांच्या ब्रेकअपला कॅटरिना जबाबदार होती. दीपिकाला सोडून रणबीर कॅटकडे आला होता. तेव्हापासून कॅट व डिप्पी या दोघींत कोल्ड वॉर सुरु होते. आता कॅट व रणबीरचेही ब्रेकअप झाले आहे. पण तरिही हे कोल्डवॉर कायम आहे. आता प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत, म्हटल्यावर ते किती गंभीर असेल, याचा अंदाज तुम्ही लावू शकताच.