Join us

कुणासोबत झाली कॅटरिना कैफची ‘दोस्ती’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 18:47 IST

बॉलिवूडमध्ये मोठ्ठं नाव झालं म्हणजे त्यांना पर्सनल लाईफ नसतं असा आपला गैरसमज असतो. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचेही ग्रुप्स असतात, ते देखील ...

बॉलिवूडमध्ये मोठ्ठं नाव झालं म्हणजे त्यांना पर्सनल लाईफ नसतं असा आपला गैरसमज असतो. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचेही ग्रुप्स असतात, ते देखील पार्टी, आऊटिंगला जात असतात, त्यांचेही बीएफएफ असतात. अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचे एकमेकांसोबत चांगले ट्यूनिंग जमते. मात्र, सध्या कॅटरिना कैफ हिची परिणीती चोप्रासोबत उत्तम बाँण्डिंग जमलीय. त्यांच्या मैत्रीकडे पाहून असे वाटते की, ‘ही दोस्ती तुटायची नाय...’                                               ‘एक था टायगर’ मध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही रोमँटिक जोडी आपल्याला पहावयास मिळाली होती. आता पुन्हा एकदा कॅट आणि सल्लूमियाँ हे ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पण, सध्या ती एका व्यक्तीच्या मैत्रीमध्ये चांगलीच रमली आहे. कोण आहे ही व्यक्ती? बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा हिच्यासोबत तिची गट्टी जमल्याचे दिसतेय. मागील वर्षी जेव्हा ते ‘ड्रीम टीम टूर २०१६’ साठी यूएसला गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर आणि करण जोहर हे देखील होते. कॅटरिना नेहमीच आत्तापर्यंतची आलियाची जवळची मैत्रीण राहिलेली  आहे. मात्र, परिणीतीसोबतही तिची आता चांगली ट्यूनिंग जमली आहे. त्यांच्या यारीदोस्तीला कुणाचीही नजर लागू नये एवढीच आमची इच्छा आहे.