Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅटरिना कैफलाही करायचंय लग्न, पण ही आहे अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 16:11 IST

कॅट आता 35 वर्षाची झाली आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा सलमानसह तिचे अफेअर होते. त्यानंतर रणबीरच्या प्रेमात कॅट पडली. नंतर काही दिवसानंतर या दोघांचेही नाते संपुष्टात आले होते.

सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, सोनम कपूर या आघाडीच्या अभिनेत्रींनी लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आता. आता या अभिनेत्रींनंतर कॅटरिना कैफकडे सा-यांच्या नजरा वळल्या आहेत. कॅटही कधी लग्न करणार असे प्रश्नही तिला अनेकवेळा विचारले जातात. 

'लग्न' हा विषय येताच कॅटरिनाने आतापर्यंत मौनच बाळगणे पसंत केले होते. मात्र मीडियाने नेहमीप्रमाणे लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला तेव्हा, तेव्हा तिनेही शांत न राहता  पहिल्यांदाच असे काही उत्तर दिले की, ते ऐकून सारेच स्तब्ध झाले होते. लग्न तर मलाही करायचे आहे. योग्य वेळ येइल तेव्हा नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करेन. पण माझ्या बरोबर लग्न करण्यासाठी कृपा करून कोणीतरी थांबावे हीच एक इच्छा आहे. अशा कॉमेडी अंदाजात उत्तर देताच सा-यांना हसु आवरणे कठीण झाले होते.

 

कॅट आता 35 वर्षाची झाली आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा सलमानसह तिचे अफेअर होते. त्यानंतर रणबीरच्या प्रेमात कॅट पडली. नंतर काही दिवसानंतर या दोघांचेही नाते संपुष्टात आले. आता रणबीर आणि आलियाच्या प्रेमाच्या वावड्या उठल्या आहेत. त्यामुळे जिथे जिथे कॅट मीडियाला सामोरे जाते तिथे तिथे रणबीरच्या अजब प्रेमाविषयी कॅटला प्रश्न विचारले जात आहेत. म्हणूनच कॅटनेही हलक्या फुलक्या ढंगात उत्तर देत वेळ मारून नेल्याचे पाहायला मिळाले.   

टॅग्स :कतरिना कैफसलमान खानराणा दग्गुबतीआलिया भट