Join us

या महाराष्ट्रीयन डिशच्या प्रेमात आहे कतरिना कैफ, पाहा हा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:28 IST

कतरिनाने एका ताटाचा फोटो शेअर करत मी आज दुपारी हे जेवण जेवले असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

ठळक मुद्देतिने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या ताटात आपल्याला वांग्याचे भरीत, दाळ चीला, पालक दाळ, शिमला बटाटा पाहायला मिळत आहे.

कतरिना कैफने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून कतरिना फेमस आहे. कतरिनाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगते आणि त्यातही तिच्या फिटनेसवर तिचे चाहते फिदा आहेत. कतरिनाच्या फिटनेसचे रहस्य काय आहे हे तिने नुकतेच सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

कतरिनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिचे डाएट काय आहे हे तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. तिने एका ताटाचा फोटो शेअर करत मी आज दुपारी हे जेवण जेवले असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या ताटात आपल्याला वांग्याचे भरीत, दाळ चीला, पालक दाळ, शिमला बटाटा पाहायला मिळत आहे. तिने देखील फोटोच्याखाली या पदार्थाची नावं लिहिली आहेत. कतरिना डाएटिंग न करता सामान्य लोकांसारखे जेवण जेवते हे पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच ती वांग्याचे भरीत या मराठी डिशच्या प्रेमात असल्याचे यावरून दिसत आहे.  

कतरिना कैफ बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या खास फॅशन सेन्स आणि लूकमुळे ती अनेक तरुणींची स्टाइल आयकॉन आहे. कतरिना कैफ आगामी चित्रपट सूर्यवंशी चित्रपटात दिसणार आहे.

‘सुर्यवंशी’ या सिनेमात अक्षय कुमार एटीएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता. ‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरू होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव वीर सुर्यवंशी आहे. 

टॅग्स :कतरिना कैफ