सलमान खानचा लाडका भाचा आहिलसोबत टॉय ट्रेनमध्ये फेरफटका मारताना दिसली कॅटरिना कैफ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 22:01 IST
अभिनेत्री कॅटरिना कैफ खान परिवाराच्या किती क्लोज याचा पुरावा समोर आला आहे. होय, कॅट सलमानचा लाडका भाचा आहिलसोबत टॉय ट्रेनमध्ये फेरफटका मारताना दिसली.
सलमान खानचा लाडका भाचा आहिलसोबत टॉय ट्रेनमध्ये फेरफटका मारताना दिसली कॅटरिना कैफ!
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याला मुलांप्रती प्रचंड लळा आहे. परंतु सलमानच नव्हे तर त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ हिलादेखील लहान मुलांप्रती प्रचंड लळा आहे. कॅटरिनाचा एक फोटो समोर आला असून, त्यातून ते स्पष्ट होते, त्याचबरोबर कॅट अजूनही सलमानच्या कुटुंबीयांशी किती क्लोज आहे हेदेखील दिसून येते. काल अभिनेत्री राणी मुखर्जी हिची मुलगी अदिराचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. या बर्थडे सेलिब्रेशन पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सनी हजेरी लावली होती. करिना कपूरचा लाडका तैमूर, करण जोहरचे जुळे मुले यासह सलमान खानचा भाचा पार्टीत बघावयास मिळाला. त्याचबरोबर आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहरूख खान, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ यांनीही पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीत मुले आपल्या आई-वडिलांची कंपनी एन्जॉय करीत असतानाच सलमान खानचा भाचा आहिल मात्र कॅटरिना कैफची कंपनी एन्जॉय करताना दिसला. कॅटरिना आहिलसोबत एका टॉय ट्रेनचा आनंद घेताना दिसली. आहिलची आई अर्पिता खान-शर्मा हिने या दोघांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यात कॅट आणि आहिल टॉय ट्रेनची स्वारी करताना दिसत आहेत. खरं तर कॅटरिनाला लहान मुलांसोबत खेळायला अन् त्यांच्यासोबत वेळ व्यतित करायला खूप आवडते. त्यामुळे ती सलमानच्या भाच्यासोबत संपूर्ण पार्टीदरम्यान एन्जॉय करताना दिसली. वास्तविक कॅटरिना सलमानची बहीण अर्पिता हिच्यासह संपूर्ण खान परिवाराच्या क्लोज आहे. नुकतीच ती सलमानची आई सलमा खान यांच्या बर्थडे पार्टीत बघावयास मिळाली होती. असो, सलमान आणि कॅटरिना सध्या त्यांच्या आगामी ‘टायगर जिंदा हंै’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तब्बल पाच वर्षांनंतर हे दोघे एकत्र झळकणार आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.