‘टायगर जिंदा हैं’च्या यशाने हरकून गेली कॅटरिना कैफ, चाहत्यांचे मानले आभार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 20:59 IST
गेल्या काहीकाळापासून सातत्याने अपयशाचा सामना करीत असलेली अभिनेत्री कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा हैं’च्या यशाने भारावून गेली आहे. अली अब्बास ...
‘टायगर जिंदा हैं’च्या यशाने हरकून गेली कॅटरिना कैफ, चाहत्यांचे मानले आभार!
गेल्या काहीकाळापासून सातत्याने अपयशाचा सामना करीत असलेली अभिनेत्री कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा हैं’च्या यशाने भारावून गेली आहे. अली अब्बास दिग्दर्शित या चित्रपटात कॅटरिनाने जासूस जोयाची भूमिका साकारली असून, प्रेक्षकांना ती प्रचंड पसंतीस येत आहे. याविषयी कॅटने सांगितले की, प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमाने मी भारावून गेली आहे. शिवाय चित्रपटाच्या यशामुळे आनंदही होत आहे.’ या चित्रपटात अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असून, तब्बल पाच वर्षांनंतर या दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. दरम्यान, कॅटने म्हटले की, ‘हे अविश्वसनीय आहे. आम्ही जेव्हा ‘टायगर जिंदा हैं’वर काम सुरू केले तेव्हा आम्हाला विश्वास वाटत होता की, आमच्याकडे एक चांगली पटकथा आहे. अलीने या पटकथेला सर्वोत्तम बनविण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. आम्ही ज्या पद्धतीने हा चित्रपट पडद्यावर साकारला आहे, त्यावरून प्रेक्षक समाधानी आहेत. चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करीत आहे. पुढे बोलताना कॅटरिनाने म्हटले की, ‘एक अभिनेत्री म्हणून मी नेहमीच अशा चित्रपटाचा भाग बनू इच्छिते. ज्या पद्धतीच्या प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यावरून मी समाधानी आहे. तसेच प्रेक्षकांचे आम्ही मनोरंजन करण्यात यशस्वी झाल्याचा आनंदही होत आहे. दरम्यान, ‘टायगर जिंदा हैं’ २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स आॅफिसवर १७३ कोटी रूपयांची कमाई केली होती. तीनच दिवसांत ४५.५३ कोटी रूपयांचा गल्ला जमवित या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला होता. आता ‘टायगर जिंदा हैं’ हा चित्रपटदेखील असाच काहीसा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.