कॅटरिना कैफची डुप्लिकेट आहे ‘ही’ मॉडेल; ‘या’ अभिनेत्याला करीत आहे डेट, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 21:20 IST
सध्या सोशल मीडियावर मॉडेल आणि अभिनेत्री सलोनी चोपडा हिचे फोटो चांगलेच चर्चिले जात आहेत. २५ वर्षीय सलोनीचे सोशल मीडियावर ...
कॅटरिना कैफची डुप्लिकेट आहे ‘ही’ मॉडेल; ‘या’ अभिनेत्याला करीत आहे डेट, पाहा फोटो!
सध्या सोशल मीडियावर मॉडेल आणि अभिनेत्री सलोनी चोपडा हिचे फोटो चांगलेच चर्चिले जात आहेत. २५ वर्षीय सलोनीचे सोशल मीडियावर बरेचसे फॉलोअर्स आहेत. त्यांच्याकडून तिची तुलना बॉलिवूड हॉट अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्याशी केली जात आहे. एवढेच नव्हे तर सलोनीच्या चाहत्यांच्या मते, ती कॅटची डुप्लिकेट आहे. कारण तिचा चेहरा कॅटच्या चेहºयाशी बºयापैकी मिळताजुळता आहे. सलोनी मुंबई येथे राहत असून, तिचे होमटाउन चंदीगढ आहे. सध्या सलोनी कॅटरिना कैफमुळे चांगलीच चर्चेत आली असून, ती याविषयी खूश आहे. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांसाठी सातत्याने हॉट फोटो शेअर करताना दिसते. दरम्यान, सलोनी चोपडा अभिनेता सत्यजित दुबे याला डेट करीत आहे. सत्यजितसोबतच्या तिच्या प्रेमप्रकरणावरूनही ती चांगलीच चर्चेत आहे. शिवाय ती बॉलिवूडमध्ये येईल अशी शक्यताही वर्तविली जात आहे. ज्या पद्धतीने सलोनीला सोशल मीडियावर प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून ती लवकरच अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार असे म्हटले तर घाईचे ठरू नये. वास्तविक सलोनी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव आहे. तिने तिचे बरेचसे हॉट आणि बोल्ड फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर सलोनीचे २,६०,००० इतके फॉलोअर्स आहेत. सलोनी एमटीव्हीवरील ‘गर्ल्स आॅन टॉप’ या शोमध्ये झळकली होती. सलोनीला महिलांशी संबंधित मुद्द्यांवर बोलायला आवडते. काही दिवसांपूर्वीच तिने एक फोटो शेअर करत महिलांसंबंधित एका विषयावर आपले मत मांडले होते. सलोनीला किक बॉक्सिंग आणि स्विमिंग करायला खूप आवडते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती नियमित एक्सरसाइज करणे पसंत करते. त्याचबरोबर डायटवरही विशेष लक्ष देते. सलोनीने मुंबईतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हाय स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. तिने ‘माया’ नावाच्या लघुपटात कामही केले आहे.