Join us

कतरिना कैफचा लहानपणीचा फोटो होतोय तूफान व्हायरल, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल- सो क्युट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:38 IST

कतरिना कैफ आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली.

कतरिना कैफ आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. लॉकडाऊनमध्ये कतरिना सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सतत इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. कतरिना कैफ आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून कतरिना फेमस आहे. 

सध्या कतरिनाच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. निळ्या रंगाच्या स्वेटर परिधान केलेली कतरिना क्युट स्माईल देते आहे.  हा फोटो तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

कतरिना कैफ बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या खास फॅशन सेन्स आणि लूकमुळे ती अनेक तरूणींची स्टाइल आयकॉन आहे. कतरिना कैफ आगामी चित्रपट सूर्यवंशी चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय.

टॅग्स :कतरिना कैफ