Join us

कॅटरिना कैफ अन् वरुण धवनची जमली जोडी, ‘या’ चित्रपटात झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 19:04 IST

अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि वरुण धवन बॉलिवूडमधील नव्या जनरेशनमधील जबरदस्त डान्सर आहेत. जेव्हा जेव्हा या दोघांची गाणी रिलीज होतात ...

अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि वरुण धवन बॉलिवूडमधील नव्या जनरेशनमधील जबरदस्त डान्सर आहेत. जेव्हा जेव्हा या दोघांची गाणी रिलीज होतात तेव्हा चाहत्यांना हा विश्वास नक्कीच असतो की, त्यात डान्सच्या जबरदस्त स्टेप बघावयास मिळतील. अशात जर हे दोन्ही स्टार एखाद्या चित्रपटात झळकत असतील तर? कदाचित तुम्हीदेखील असाच विचार करीत असाल की, दोघांनी एक तरी चित्रपट एकत्र करायला हवा. असे झाल्यास डान्सच्या अशा काही स्टेप्स बघावयास मिळतील ज्या चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील. असो, चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार, वरुण आणि कॅटरिना लवकरच एकत्र काम करताना बघावयास मिळणार आहेत. असे म्हटले जात आहे की, ‘एबीसीडी’ चित्रपटाच्या तिसºया भागात हे दोघे जबरदस्त डान्सरच्या भूमिकेत झळकणार आहेत. खरं तर कॅटने याबाबतचे संकेत तेव्हाच दिले होते जेव्हा तिने अर्जुन आणि वरुणसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी अशीही चर्चा रंगली होती की, हे तिघे ‘गुंडे-२’साठी एकत्र येणार आहेत. परंतु आता येत असलेल्या माहितीनुसार, कॅट आणि वरुण एबीसीडीच्या सीरिजवर काम करीत आहेत. दरम्यान, या दोघांनी त्यांच्या आगामी ‘एबीसीडी-३’ची शूटिंग सुरू करण्याअगोदर चाहत्यांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. कालच कॅटने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘झीरो’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. ज्यास वरुण धवनने अतिशय चकित करणारी कॉमेण्ट दिली. वरुणने कॅटचा फोटो बघितल्यानंतर लिहिले की, फोटोमध्ये दिसत असलेली भिंत मला खूप पसंत आली. वरुणच्या या कॉमेण्टनंतर हे दोघे लवकरच एकत्र येतील, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.