Join us

कॅटरिना कैफमुळे आदित्य रॉय-कपूरच्या आयुष्याचा होतेय तमाशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 11:19 IST

आदित्य रॉय-कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यामध्ये वाढणारी सलगी सध्या मीडिया गॉसिपमध्ये हॉट विषय आहे. सुरुवातीपासूनच ते एकमेकांचे चांगले मित्र ...

आदित्य रॉय-कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यामध्ये वाढणारी सलगी सध्या मीडिया गॉसिपमध्ये हॉट विषय आहे. सुरुवातीपासूनच ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र, आता रणबीरशी तिचे ब्रेक-अप झाल्यापासून तिचे नाव वारंवार आदित्यशी जोडले जात आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिले गेल्यामुळे दोघांमध्ये नेमके काय रिलेशन आहे याबाबत मीडिया आणि फॅन्स दोघांना उत्सुकता आहे.मित्रांमध्ये एक अलिखित नियम असतो की, आपल्या बेस्ट फ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट करायचे नाही. त्यामुळे आदित्य कॅटरिनाला केवळ मित्र म्हणून कंपनी देत असल्याचे बोलले जाऊ लागले. पण मध्यंतरी अशी बातमी आली की, रणबीरच्या नव्या घराच्या पार्टीला दांडी मारून आदित्य कॅटकडे गेल्यामुळे रणबीर प्रचंड नाराज आहे. यावर कोणीच अधिकृत प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हते.अखेर एका मुलाखतीमध्ये आदित्यने याबाबत भाष्य केले. तो म्हणाला की, ‘मीडिया आणि लोक आमच्याविषयी नेहमीच खोट्या बातम्या पसरवित असतात. आमच्या कामाची जास्त चर्चा व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा असते परंतु लोकांना आमच्या खासगी जीवनातच अधिक रस असल्यामुळे कोण कोणाला डेट करतो याकडे त्यांचे लक्ष असते. मला माझी प्रायव्हसी फार महत्त्वाची आहे. अनेक स्टार्स त्यांच्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलत नाही कारण लोक लगेच गॉसिप सुरू करतात. आमच्या आयुष्याचा तमाशा बनू न देण्यासाठी मी गप्प राहणेच पसंत करतो.’पुढे तो म्हणाला की, ‘दोन सेलिब्रेटी एकत्र दिसले की, लगचे त्यांच्या अफेयरची चर्चा सुरू होते. अशा गॉसिपमुळे आमच्या खासगी जीवनावर काय परिणाम होत असेल याचा ते विचारही करीत नाही. आधी श्रद्धा कपूर आणि आता कॅटरिनाशी माझे नाव जोडले जात असले तरी त्या केवळ माझ्या मैत्रिणी आहेत.’