Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कॅटरिना-कबीर यांच्यात बायकोची मध्यस्थी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 18:08 IST

दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत कॅटरिना कैफचे सांगले संबंध आहेत. मात्र ताज्या बातमीनुसार, कॅटरिना कबीरवर नाराज आहे. कबीर खानचा पुढील ...

दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत कॅटरिना कैफचे सांगले संबंध आहेत. मात्र ताज्या बातमीनुसार, कॅटरिना कबीरवर नाराज आहे. कबीर खानचा पुढील चित्रपट या मागचे कारण आहे. यात सलमान खानसोबत दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा आहे. यामुळे कॅटरिना कबीरवर रागावली आहे. रणबीरमुळे दीपिकासोबत कॅटरिनाचे संबंध कसे असतील, हे तुम्ही जाणू शकता. त्याचमुळे कबीरच्या नव्या चित्रपटात दीपिका असणार हे ऐकून कॅटरिना दुखावली गेली आहे म्हणे. याचवरून दोघांमध्ये बिनसल्याचे कळते. अर्थात कबीर वा कॅटरिना याबाबत काहीही बोललेले नाहीत. मात्र कबीर खानची पत्नी मिनी माथुर हिने मात्र यावर एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही कबीर व कॅटरिनाबाबत बोलत आहात? या दोघांबद्दल काहीही खरे नाही. मात्र एक चांगली कल्पना. यासाठी १० पैकी १० मार्क्स! असे टिष्ट्वट तिने केले आहे. कॅटने ‘न्यूयॉर्क’, ‘एक था टायगर’ व फँटम‘’ यासारख्या चित्रपटात कबीरसोबत काम केले आहे.