Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘फितूर’मधील ‘कॅटरिना’ आता झाली १६ वर्षांची, पाहा तिचे ताजे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 10:47 IST

‘फितूर’ हा कॅटरिना कैफ स्टारर चित्रपट ज्यांनी कुणी पाहिला असेल, त्यांना एक चेहरा नक्की आठवत असेल. होय, तो म्हणजे, ...

‘फितूर’ हा कॅटरिना कैफ स्टारर चित्रपट ज्यांनी कुणी पाहिला असेल, त्यांना एक चेहरा नक्की आठवत असेल. होय, तो म्हणजे, या चित्रपटात बालपणीच्या कॅटरिनाचा. चित्रपटात कॅटरिनाची बालपणीची भूमिका तुनिषा शर्मा हिने साकारली होती.  ‘बार बार देखो’ या चित्रपटातही कॅटरिना अर्थात दीयाच्या लहानपणीच्या भूमिकेत तुनिषा दिसली होती. ‘कहानी2’ या चित्रपटातही तुनिषाने विद्या बालनच्या मुलीची भूमिका साकारली होती. हीच तुनिषा आता १६ वर्षांची झाली आहे आणि कमबॅकसाठी तयार आहे.तुनिषा आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. शिवीन नारंगच्या अपोझिट ‘ई लव्ह’ या लवकरच सुरू होणा-या मालिकेत तुनिषा मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका इंटरनेटवर होणा-या रोमान्स आणि सामाजिक रूढी परंपरेवर आधारित आहे. यापूर्वी ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ आणि ‘भारत के वीर पुत्र महाराणा प्रताप’ यासारख्या मालिकेतही तुनिषा दिसली आहे.तुनिषाचा जन्म पंजाबच्या चंदीगडमधला. ४ जानेवारी २००२ रोजी तिचा जन्म झाला. ‘कहानी2’मध्ये ती दिसली तेव्ही ती केवळ १४ वर्षांची होती. अभिनयाचे कुठलेही प्रशिक्षण न घेता या चित्रपटात तुनिषाने अगदी जिवंत अभिन केला. यात तिने मिनीची भूमिका साकारली होती. ‘फितूर’साठी तुनिषाची निवड झाली कारण, तिचे कॅटरिनासारखे दिसणे. होय, तुनिषा कॅटरिनासारखी दिसते. त्यामुळे ‘फितूर’ आणि पाठोपाठ ‘बार बार देखो’ या चित्रपटांत कॅटच्या लहानपणीची भूमिका साकारण्यासाठी तिची निवड झाली.​ही तुनिषा आता अभिनयाच्या क्षेत्रात चांगलीचं रूळली आहे आणि नवनव्या भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. तूर्तास कॅटरिनाच्या बालपणीची भूमिका साकारणारी तुनिषा किती बदलली, ते आपण पाहुयात. तिचे काही ताजे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ते बघा आणि कसे वाटले, ते आम्हाला जरूर कळवा.