Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कॅटरिना, हे वागणं बरं नव्हं..!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 22:07 IST

कॅटरिना कैफ कालच मोरोक्कोमधील शूटींग आटोपून भारतात परतली. रणबीर कपूरसोबत ‘जग्गा जासूस’चे शूटींग संपवल्यानंतर भारतात परतलेल्या कॅटरिनाच्या स्वागतासाठी अनेक ...

कॅटरिना कैफ कालच मोरोक्कोमधील शूटींग आटोपून भारतात परतली. रणबीर कपूरसोबत ‘जग्गा जासूस’चे शूटींग संपवल्यानंतर भारतात परतलेल्या कॅटरिनाच्या स्वागतासाठी अनेक फोटोग्राफर्स व पत्रकार उत्सूक होते. पण मुंबई विमानतळावरील कॅटरिनाला मात्र फोटोग्राफर्सला पोझ देण्यात आणि मीडियाला बाइट देण्यात जराही इंटरेस्ट दिसला नाही. कॅटरिनाच्या बॉडीगार्डने  एकाही मीडिया मॅनला कॅटरिनापर्यंत पोहोचू दिले नाही. पत्रकारांशी बोलणारच नसशील, फोटोग्राफर्सला पोझ देणार नसतील तर आम्हाला बोलावले का? असा प्रश्न काही मीडियामॅननी संतापून कॅटरिनाला विचारला. यावर कॅटरिना काय म्हणाली माहितीयं??? मैंने नहीं बुलाया..कॅटरिनाचा हा तोरा, तिचे अ‍ॅटीट्यूड याचा पुरावा म्हणजे हा व्हिडिओ. आता कॅटरिना मीडियाला असे झिडकारणे बरे नव्हे...आता तुला हे कोण सांगणार??}}}}