Kathua Rape Case : बॉलिवूडमध्ये तीव्र संताप; म्हटले, ‘अखेर देव कुठे आहे?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 16:55 IST
जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील आठ वर्षांच्या चिमुरडीवर अतिशय निर्दयीपणे अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. देशातील कानाकोपºयातून ...
Kathua Rape Case : बॉलिवूडमध्ये तीव्र संताप; म्हटले, ‘अखेर देव कुठे आहे?’
जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील आठ वर्षांच्या चिमुरडीवर अतिशय निर्दयीपणे अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. देशातील कानाकोपºयातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून, बॉलिवूडमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आपला आक्रोश व्यक्त केला. फरहान अख्तर, सोनम कपूर, सानिया मिर्झा, जावेद अख्तर, कल्की कोचलीन, ट्विंकल खन्ना यांच्यासह अनेक सेलेब्सनी सोशल मीडियावर ट्विट करून या प्रकरणातील नराधमांना कठोरात कठोर शासन केले जावे असे म्हटले, तर काहींनी ‘अखेर देव कुठे आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला. फरहान अख्तरने लिहिले की, ‘जरा विचार करा, त्या आठ वर्षीय मुलीवर काय बितली असेल, जिच्यासोबत हा संताप आणणारा प्रकार घडला. मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. जर तुम्ही आसिफासाठी जस्टिस नाही मागू शकत तर तुम्ही काहीच करू शकत नाही.’ सोनम कपूरने लिहिले की, ‘फेक नॅशनल्स आणि फेक हिंदूंना लाज वाटायला पाहिजे. मला खरंच विश्वास होत नाही की, हे आपल्या देशात घडत आहे.’ जावेद अख्तर यांनी लिहिले की, ‘जे लोक महिलांच्या हितासाठी न्यायाची मागणी करीत आहेत, त्यांनी या घटनेनंतर स्टॅण्ड घ्यायला हवा. आपला आवाज बुलंद करायला हवा. बलात्काºयांविरोधात पुढे यायला हवे.’ अभिनेता वीरदासने लिहिले की, ‘ही बातमी वाचल्यानंतर मला श्वास घेणेही अवघड होत आहे. मला हे शेअर करण्याची आवश्यकता आहे. तुम्हालाही हे शेअर करायला हवे.’ सिमी ग्रेवालने लिहिले की, ‘या ग्रहावर अशी कुठलीच जात नाही, जी यापेक्षा बर्बर आहे. आसिफाचे गुन्हेगार खरोखर राक्षस आहेत. या गुन्हेगारांना त्यांनी केलेल्या कृत्यासाठी आपल्याकडे तशी शिक्षादेखील नाही. केवळ आठ वर्षांची मुलगी? मला एवढेच विचारायचे आहे की, अखेर देव कुठे आहे?’ अभिनेत्री कल्की कोचलिनने एक फोटो शेअर करताना लिहिले की, ‘मी हिंदुस्थानात आहे अन् या घटनेमुळे अपराधी समजत आहे.’ सोनाली बेंद्रेने लिहिले की, ‘हे खूपच लाजिरवाणे आहे की, आपण मानवता दाखविण्यासाठी धर्मासारख्या मुद्द्यावर समोर येत आहोत.’ तर अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही या घटनेची तीव्र निंदा करताना निषेध केला. तसेच गुन्हेगारांबद्दल दाखविल्या जात असलेल्या सहानुभूतीबद्दलही रोष व्यक्त केला.