KATHTHI REMAKE: अक्षय कुमारऐवजी हृतिक रोशन करणार का ‘कथ्थी’ रिमेक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 18:14 IST
या प्रोजेक्टशी निगडित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या जागी निर्माते हृतिक रोशनला घेऊन सिनेमा करण्याची तयारी करीत आहेत. हृतिकशी चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घोषीत करण्यात येणार आहे.
KATHTHI REMAKE: अक्षय कुमारऐवजी हृतिक रोशन करणार का ‘कथ्थी’ रिमेक?
दाक्षिणात्य सिनेमांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड कायम ठेवत बॉलीवूडमध्ये लवकरच ‘कथ्थी’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्यात येणार आहे. सुरूवातीला चर्चा होती की, ‘खिलाडी’ अक्षय कुमार या रिमेकमध्ये प्रमुख भूमिकेत काम करणार आहे. परंतु आता या सिनेमात अक्षयऐवजी हृतिक रोशनची निवड होणार असल्याची शक्यता आहे.या प्रोजेक्टशी निगडित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या जागी निर्माते हृतिक रोशनला घेऊन सिनेमा करण्याची तयारी करीत आहेत. हृतिकशी चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घोषीत करण्यात येणार आहे. ‘गजनी’ फेम दिग्दर्शक ए. आर. मुरुगाडॉस हे स्वत: हा रिमेक बनविणार आहे.►ALSO READ: अक्षय कुमारच्या कॅनडा पासपोर्टवरून वाद! विचारल्यावर दिले चकित करणारे उत्तरमध्यंतरी ‘जॉली एलएलबी २’ स्टार अक्षयला जेव्हा याबाबत विचारण्यात आले होते तेव्हा तो म्हणाला होता की, ‘सध्या केवळ बोलणी सुरू असल्यामुळे निश्चित असे काहीच सांगू शकत नाही.’ परंतु आता अशी माहिती मिळतेय की, निर्माते त्याच्याऐवजी हृतिकला घेण्यासाठी अधिक उत्सुक आहेत.विशेष म्हणजे गेल्या वर्षी हृतिक आणि अक्षय यांचे ‘मोहेंजोदडो’ आणि ‘रुस्तम’ हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर एकाच दिवशी रिलीज झाले होते. यामध्ये अक्षयने तिकिट खिडकीवर बाजी मारली होती. त्यामुळे आता अक्षयला बाहेर करून हृतिकने तो करत असलेला चित्रपट मिळवला असेच म्हणावे लागेल.► ALSO READ: हृतिक रोशन जर्मनीत शोधतोय डिप्रेशनवर इलाज!२०१४ साली आलेल्या ‘कथ्थी’ चित्रपटाचा तेलुगु रिमेक ‘कैदी नं. १५०’ या नावाने नुकताच प्रदर्शित झाला. सुमार दहा वर्षांनंतर सुपरस्टार चिरंजीवी यांचे या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन झाले. यावर्षी टॉलीवूडमधील तो पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. ‘कथ्थी’ एका सराईत गुन्हेगाराची कथा आहे जो एका गावाला धनाढ्य व्यवसायिकांपासून वाचविण्यासाठी लढा देतो. ‘शेतकरी आत्महत्ये’सारख्या अत्यंत संवेदनशील मुद्याला सिनेमात हात घालण्यात आलेला आहे. यापूर्वी ए. आर. मुरुगाडॉस आणि सलमान खानचे एकत्र फोटो आल्यावर सलमानचे नाव हिंदी रिमेकसाठी चर्चेत आले होते. मूळ तामिळ चित्रपटात इलियापती विजय प्रमुख भूमिकेत होता.► ALSO READ: बॉलीवूड सक्सेस मंत्रा - साऊथ का रिमेक बनाओ और पैसे कमाओ