Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅट-सिदची ‘रॅप अप पार्टी’ वेळी धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 09:10 IST

नित्या मेहरा दिग्दर्शित चित्रपट ‘बार बार देखो’ ची शूटिंग संपली असून त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या रॅप अप पार्टीवेळी कॅटरिना कैफ ...

नित्या मेहरा दिग्दर्शित चित्रपट ‘बार बार देखो’ ची शूटिंग संपली असून त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या रॅप अप पार्टीवेळी कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी खुप धम्माल केली. ते दोघेही तिथे खुपच चॅटी आणि फन मुडमध्ये दिसले.कॅटरिना म्हणते, ही तिची सर्वांत चांगल्या स्क्रिप्टपैकी एक स्क्रिप्ट आहे. यात एवढे काय स्पेशल आहे ते माहिती नाही. पण, या चित्रपटाची स्क्रिप्ट मला खुपच आवडली. माझ्या आत्तापर्यंतच्या सर्वांत चांगल्या चित्रपटांपैकी एक हा चित्रपट असणार आहे. तुम्ही थोडं वाट पहा म्हणजे तुम्हाला कळेल.’सिद्धार्थ म्हणाला,‘ मी चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहे. आम्ही सप्टेंबर महिन्यासाठी एक चांगले प्रोडक्ट घेऊन येत आहोत.’ कॅट आणि सिद्धार्थ दोघे एकमेकांची खुप गंम्मत घेत होते. चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.