Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅट म्हणते,‘नीतू कपूरला नाही भेटली माझी आई’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 11:15 IST

कॅ टरिनाच्या हिट चित्रपटांपेक्षा तिच्या ब्रेकअप विषयीच्या बातम्याच जास्त आहेत, असे दिसते आहे. जेव्हापासून तिचा रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाला ...

कॅ टरिनाच्या हिट चित्रपटांपेक्षा तिच्या ब्रेकअप विषयीच्या बातम्याच जास्त आहेत, असे दिसते आहे. जेव्हापासून तिचा रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाला आहे तेव्हापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे जास्तच लक्ष दिले जात आहे. दोन दिवसांपूर्वी कळाले होते की,‘ तिची आई सुझान टुर्कोट मुंबईत येणार आहे. येण्याचे कारण नीतू कपूरची भेट घेणे हे होते,’ असल्याचे बोलले जात होते.ती नुकतीच एका अ‍ॅवॉर्ड्स सोहळ्यासाठी आली असता तिच्यावर ‘तुझी आई मुंबईत नीतू कपूरला भेटण्यासाठी आली होती का? ’ या प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. तेव्हा ती म्हणाली,‘ येस माय मदर इन इन मुंबई, अ‍ॅण्ड नो, शी इज हिअर टू मीट नीतू कपूर.’ तिची आई पाँडेचेरी येथून एका आॅपरेशनसाठी आली होती.त्यांची तब्येत ठीक नाही आणि कॅटला वाटत होते की, तिच्यासमोर तिच्या आईची सर्जरी व्हावी. ती काही महिन्यांतच परत पाँडेचेरीला निघून जाणार आहे. कॅट देखील आता तिच्या करिअरवर लक्षकेंद्रित करत असून कुठलीही सहानुभूती ती मिळवू इच्छित नाही. तिच्या घरातील कोणीही कपूर कुटुंबियांशी संबंध ठेवू इच्छित नाही.