Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : इम्तियाज अलीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला कार्तिक आर्यन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 14:20 IST

होय, कार्तिकचा एक इमोनशल व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

ठळक मुद्देसोनू के टीटू की स्वीटी आणि पाठोपाठ  लुका छुपी  या दोन चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता कार्तिककडे सध्या निर्मात्यांची  रांग लागली आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या ‘लव आज कल 2’ या आगामी चित्रपटाचे 66 दिवसांचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले.  शूटींग संपल्यानंतरची रॅपअप पार्टीही रंगली. पण या पार्टीत कार्तिक व आर्यन दोघेही उदास दिसले. कार्तिक तर इतका भावूक झाला की, ढसाढसा रडू लागला.होय, ‘लव आज कल 2’च्या सेटवरचा कार्तिकचा एक इमोनशल व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. चित्रपटाचा शेवटचा सीन संपल्यासंपल्या कार्तिक इतका भावूक झाला की, दिग्दर्शक इम्तियाल अलीच्या गळ्यात पडून रडू लागला.

कार्तिकने सारासोबतचा एक फोटो शेअर करत एक भावूक पोस्टही लिहिली. ‘ हा चित्रपट, त्याचे शूटींग संपूच नये, असे वाटले. या संपूर्ण प्रवासात प्रिन्सेस सारा अली खानइतकी दुसरी चांगली सोबत असूच शकत नाही. मला तुझ्यासोबत यापुढेही काम करायला आवडेल,’ असे त्याने लिहिले.

साराही कार्तिकच्या आठवणीने व्याकूळ झाली.‘माझी सतत काळजी घेण्यासाठी तुझे आभार. तुझ्यासोबत घेतलेली कॉफी, तुझ्यासोबत प्यालेला चहा...मला पुन्हा हे करायला आवडेल. मी तुला किती मिस करेल, याचा तुला अंदाजही नाही...,’ असे साराने लिहिले.   

सोनू के टीटू की स्वीटी आणि पाठोपाठ  लुका छुपी  या दोन चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता कार्तिककडे सध्या निर्मात्यांची  रांग लागली आहे. मेनस्ट्रीम चित्रपटांमागे न धावता कार्तिकने सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनाम, प्यार का पंचनामा 2, आकाशवाणी असे वेगवेगळ्या धाटणीचे हिट चित्रपट दिलेत आणि  निर्मात्यांचे  लक्ष वेधून घेतले 

टॅग्स :कार्तिक आर्यनसारा अली खान