Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यन-अनन्यची रोमँटिक कॉमेडी, 'तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी'चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:54 IST

कार्तिकचा स्वॅग, चार्मिंग अॅटिट्यूड पाहून चाहते फिदा झाले आहेत.

करण जोहर निर्मित 'तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर पाहता येणार आहे. कार्तिक आर्यन आज आपला वाढदिवस साजरा करत असून त्याने चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. 'तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी' सिनेमाचा आज टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये कार्तिकचा स्वॅग, चार्मिंग अॅटिट्यूड पाहून चाहते फिदा झाले आहेत.

१ मिनीट ३५ सेकंदांच्या या टीझरमध्ये कार्तिकचे एकापेक्षा एक मजेशीर डायलॉग्स आहेत. शिवाय त्याने आपला शर्टलेस लूकही दाखवला आहे. अनन्या पांडेही तिच्या बबली लूकमध्ये दिसत आहे. दोघांचा किंसींग सीनही दिसत आहे. दोघंही एकदम हॉट अवतारात आहेत. टीझरमधील अनेक दृश्य ही परदेशातली दिसत असून अतिशय सुंदररित्या चित्रीत करण्यात आली आहेत. 'सत्यप्रेम की कथा' फेम दिग्दर्शक समीर विध्वंस यांनीच याही सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

'तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी' सिनेमाला विशाल शेखर या संगीत दिग्दर्शक जोडीने संगीत दिलं आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. कार्तिकला पुन्हा रोमकॉम मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कार्तिक आर्यन, समीर विध्वंस आणि विशाल-शेखर एकत्र आले म्हटल्यावर हा ब्लॉकबस्टर सिनेमा होणार अशी चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kartik Aaryan and Ananya Panday's 'Tu Meri Mai Tera' teaser released.

Web Summary : Kartik Aaryan's birthday gift: 'Tu Meri Mai Tera' teaser unveiled. The romantic comedy features Kartik and Ananya's chemistry, directed by Sameer Vidwans, promising a blockbuster.
टॅग्स :कार्तिक आर्यनअनन्या पांडेबॉलिवूड