Join us

कार्तिक आर्यन बॉलिवूडच्या ह्या अ‍ॅक्टरवर होतो Jealous, खुद्द त्यानेच सांगितले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 19:54 IST

अभिनेता कार्तिक आर्यनने 'सोनू की टीटू की स्वीटी' व 'लुका छिपी' या चित्रपटातून प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने 'सोनू की टीटू की स्वीटी' व 'लुका छिपी' या चित्रपटातून प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. इतकेच नाही तर त्याने बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. 'लुका छिपी' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर सिनेमाची निवड करताना काळजी घेतली पाहिजे, हे कार्तिक आर्यनला समजले आहे. त्याचे म्हणणे आहे, रणबीर कपूर असा अभिनेता आहे ज्याचे चित्रपटांची निवड पाहून माझा जीव जळतो. 

कार्तिक आर्यनला 'सोनू के टीटू की स्वीटी' पासून 'लुका छिपी' चित्रपटाच्या प्रवासाकडे तू कशापद्धतीने पाहतोस, असे विचारले असता तो म्हणाली की, हा खूप कठीण प्रवास होता. कारण 'सोनू की टीटू की स्वीटी'च्या यशानंतर माझी जबाबदारी वाढली. मी कोणत्या चित्रपटात काम करणार आहे, याची उत्सुकता लोकांना असायची. तर काही लोक मला अयशस्वी होताना पाहण्यासाठी उत्सुक असतील, हेही मला माहित आहे. 'लुका छिपी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर व प्रेक्षकांना भावला त्यासाठी मी आभारी आहे.

कार्तिकने लुका छिपी चित्रपटाचे यश त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले .

कार्तिक आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि अनीस बझ्मींसोबतदेखील एका चित्रपटात तो काम करताना दिसणार आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनरणबीर कपूर