Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यनला लागली लॉटरी 'लव आज कल2'मध्ये तब्बल तीन अभिनेत्रींसह करणार रोमान्स  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 12:57 IST

काही दिवसांपूर्वी इम्तियाज अलीचा आगामी सिनेमा 'लव आज कल2'चा  फर्स्ट लुक आधीच आऊट झाले आहे, ज्यात सारा अली आणि कार्तिक आर्यन दिसले होते

ठळक मुद्देसारा आणि कार्तिकच्या जोडीचा हा पहिला सिनेमा आहे यासिनेमात कार्तिक फक्त सारासोबत नाही तर आणखी दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे.

काही दिवसांपूर्वी इम्तियाज अलीचा आगामी सिनेमा 'लव आज कल2'चा  फर्स्ट लुक आधीच आऊट झाले आहे, ज्यात सारा अली आणि कार्तिक आर्यन दिसले होते. सिनेमाचे नाव अद्याप फायनल करण्यात आलेले नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाचे नाव 'लव आज कल 2' असणार आहे.      

सारा आणि कार्तिकच्या जोडीचा हा पहिला सिनेमा आहे त्यामुळे दोघांचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत. आता या सिनेमासंबंधीत आणखी एक माहिती मिळतेय की या सिनेमात कार्तिक फक्त सारासोबत नाही तर आणखी दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे. रिपोर्टनुसार सारा यात मुख्य अभिनत्रीच्या भूमिकेत असेल तर बाकी दोन अभिनेत्री सहाय्यक भूमिकेत दिसतील. मात्र अजुन या दोन अभिनेत्री कोण असणार आहेत हे अद्याप कळलेले नाही.  

लव्ह आज काल या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले होते आणि या चित्रपटाच्या सिक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा देखील इम्तियाजनेच सांभाळली आहे. हे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरू होते.या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो देखील या चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण आता दिल्लीतील चित्रीकरण संपले असून ही गोष्ट सारानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या फॅन्सना सांगितली होती.

इम्तियाजच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री पाहाण्यास त्याचे फॅन्स उत्सुक असल्याचे ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

टॅग्स :कार्तिक आर्यनसारा अली खान