Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकने अद्याप नाही पाहिला ओरिजनल 'पति, पत्नी और वो', यामागचं कारण आहे इंटरेस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 19:20 IST

कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर व अनन्या पांडे आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर व अनन्या पांडे आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. कार्तिकने या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात केली आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, चित्रपटाचा कंटेट नेहमी किंग राहिला आहे. कोणताही सिनेमा चांगल्या कथेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 

कार्तिक पुढे म्हणाला की, कथा असो किंवा काल्पनिक कहाणी त्यात जर चांगला कंटेट नसेल तर त्याला प्रेक्षक स्वीकारत नाही. याबद्दल कार्तिक पति पत्नी और वो चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी बोलत होता.

त्याने या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, जेव्हा मला पति पत्नी और वो चित्रपटात काम करण्याबद्दल विचारलं होतं तेव्हा मी ओरिजनल चित्रपट न पाहण्याचा निर्णय घेतला होता. कारण कोणत्याही कारणामुळे माझ्या कामावर प्रभाव पडू नये. जर आम्ही सिनेमात मॉडर्न स्टोरी किंवा नाविन्य दाखवत आहोत तर मूळ चित्रपटाचा माझ्यावर कोणताही इफेक्ट झाला नाही पाहिजे, असे मला वाटले.

पति पत्नी और वो या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करत असून हा सिनेमा १९८७ साली याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक आहे.

ओरिजनल चित्रपटात संजीव कपूर, विद्या सिन्हा व रंजीता कौर मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाचा रिमेक ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनभूमी पेडणेकर अनन्या पांडे