Join us
Daily Top 2Weekly Top 5

भावा जिंकलंस ! कार्तिक आर्यनने चायनीज मोबाईल ब्रँडशी असलेलं 'कनेक्शन' तोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 13:01 IST

असा अंदाज लावण्यात येतो आहे की कार्तिक कडून प्रेरणा घेऊन बॉलिवूडमधील इतर सेलिब्रेटीही देशहितासाठी हे पाऊल उचलतील.

बॉलिवूड सेलिब्रेटी कार्तिक आर्यनने कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोकावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कार्तिक चायनीज मोबाईल OPPO चा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मात्र भास्करच्या रिपोर्टनुसार कार्तिकने OPPOशी असलेले नातं तोडले आहे. याची अधिकारिक घोषणा अद्याप झालेली नाही, पण कार्तिकने एक फोटो शेअर करुन या गोष्टीचे संकेत दिले आहे. ट्रेडच्या तज्ज्ञांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे तसेच चायनीज ब्रँडशी नातं तोडणार कार्तिक बॉलिवूडमधील पहिला सेलिब्रेटी बनला आहे. 

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटरवर एका फोटो शेअर केला आहे. या फोटोत कार्तिकच्या हातात आयफोन दिसतो आहे. खिडकीत बसून तो आकाशाचे फोटो काढतो आहे. यानंतर मीडियासह त्याच्या चाहत्यांनीही कार्तिकने चायनीज मोबाईल ब्रँडची जाहिरात बंद केल्याचा अंदाज वर्तविला आहे. 

यामागचे कारण जेव्हा एखादा सेलिब्रिटी एखाद्या ब्रँडचा  ब्रँड अॅम्बेसेडर असतो तेव्हा तो त्या कराराअंतर्गत सोशल मीडियावर इतर कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू शकत नाही. जर कोणी असे केले तर तो कायदेशीर अडचणीत येऊ शकतो. असा अंदाज लावण्यात येतो आहे की कार्तिक कडून प्रेरणा घेऊन बॉलिवूडमधील इतर सेलिब्रेटीही देशहितासाठी हे पाऊल उचलतील. 

टॅग्स :कार्तिक आर्यन