Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरच्या नात्यात आला दुरावा ? सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 15:55 IST

दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय कार्तिक आर्यन आणि  जान्हवी कपूर गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र स्पॉट झाले आहेत. न्यू ईअरला दोघे गोव्यात एकत्र दिसले.  आता अशी बातमी समोर येते आहे की, दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. हे पाहून कार्तिक आणि जान्हवी दोघांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला कार्तिक आणि जान्हवी गोव्यात एकत्र दिसले.  दोघे रोमँटिक डेटवर गेले आहेत अशी चर्चा होती. दोघांनाही मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले होते. आता या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी तेव्हा येते आहे जेव्हा 'दोस्ताना 2' च्या शूटिंगला उशीर झाला आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनला जाणार होती, पण इंग्लंडमधील कोरोनामुळे कडक लॉकडाऊन झाल्यामुळे हे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.

'दोस्ताना 2' हा कार्तिक आणि जान्हवीचा पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.  जर कार्तिक आणि जान्हवी यांच्यात काहीतरी बिघडलं असेल तर या सिनेमावर त्याचा असर नक्कीच पडेल. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवीने तिचा आगामी सिनेमा 'गुड लक जेरी'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय जान्हवी राजकुमार रावसोबत 'रुही अफसाना' चित्रपटातही दिसणार आहे. कार्तिक त्याचा आगामी सिनेमा ‘धमाका'चे शूटिंग करतो आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरकार्तिक आर्यन