Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यनचं मोठं मन! 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:25 IST

कार्तिक आर्यनने 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' सिनेमानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे

बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मात्र, त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे निर्मात्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन कार्तिकने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनने या चित्रपटासाठी जे मानधन घेतलं होतं त्या मानधनातून १५ कोटी निर्मात्यांना परत दिले आहेत. कार्तिक आणि अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला  'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. जेव्हा एखादा चित्रपट यशस्वी होतो, तेव्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात, मात्र चित्रपट अपयशी ठरल्यावर त्याची जबाबदारी घेणारे कमी असतात. अशा परिस्थितीत कार्तिकने स्वतःहून मानधनात परत दिल्यामुळे निर्मात्यांना होणारा आर्थिक फटका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे, कार्तिक आर्यनने अशा प्रकारचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जेव्हा त्याचा 'शहजादा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता, तेव्हाही त्याने आपल्या मानधनाचा मोठा हिस्सा सोडला होता. कार्तिकच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीत त्याचे भरभरून कौतुक होत आहे. विशेषतः निर्माते करण जोहर आणि कार्तिक यांच्यातील वादाच्या चर्चांनाही यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. कार्तिक आर्यन आता आगामी 'नागझिला' या प्रकल्पावर केंद्रित करत असून, बॉक्स ऑफिसवरील हे अपयश विसरून तो पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kartik Aaryan's Generosity: Returns Fee After Film Flop

Web Summary : Following the failure of 'Tu Meri Main Tera,' Kartik Aaryan returned ₹15 crore of his fee to alleviate producers' losses. This isn't the first time Aaryan has shown such generosity, earning him praise within the film industry and potentially resolving past disputes.
टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडसमीर विध्वंस