Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यनच्या 'भूलभूलैय्या 3' चं शूट पूर्ण, सेटवर कट केला केक; पोस्ट शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:47 IST

कार्तिक आर्यनने क्रू मेंबर्ससोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) नुकतंच 'भूलभूलैय्या 3' (Bhulbhulaiya 3) चं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'भूल भूलैय्या 2' मध्येही कार्तिक दिसला होता. आता तिसऱ्या भागात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी रोमान्स करणार आहे. तसंच सिनेमात माधुरी दीक्षित आणि ओरिजनल मंजुलिका म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनही आहे. अनिस बज्मी दिग्दर्शित या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

कार्तिक आर्यनने क्रू मेंबर्ससोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. शूट पूर्ण झाल्याचा आनंद केक कट करुन साजरा केला जात आहे. कार्तिक दिग्दर्शक अनिस बज्मीला मिठी मारत त्यांचं अभिनंदन करतोय. तो लिहितो,'अरे पगलो, भूलभूलैय्या 3 शूट पूर्ण झालं. हवेली का दरवाजा एक बार फिर खुलने के लिए, तैयार हो चुका है.'

यंदा दिवाळीच्या मुहुर्तावर 'भूलभूलैय्या 3' प्रेक्षकांना घाबरवायला येत आहे. पहिल्या भागात विद्या बालनने मंजुलिका बनून सर्वांना घाबरवून सोडलं होतं. ती आता तिसऱ्या भागात आली आहे. येत्या काही दिवसात सिनेमाचा टीझर रिलीज होणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं पुन्हा मनोरंजन करेल असं मेकर्सने आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनभूल भुलैय्याबॉलिवूड