Join us

करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरने मुलांसाठी केलीय ही मोठी तरतूद, दर महिन्याला होतो लाखोंचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:59 IST

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर(Karisma Kapoor)चे एक्स पती संजय कपूर(Sunjay Kapur)चे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. युकेमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर(Karisma Kapoor)चे एक्स पती संजय कपूर(Sunjay Kapur)चे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. युकेमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्याला करिश्मापासून दोन मुले आहेत समायरा आणि कियान. त्या दोघांच्या भवितव्यासाठी संजयने खूप काही मागे ठेवले आहे. करिश्मा कपूरने २०१६ मध्ये संजय कपूरकडून घटस्फोटाच्या अर्जासोबत तिच्या मुलांचा ताबा मागितला होता. त्यानंतर न्यायालयाने मुलांचा ताबा अभिनेत्रीला दिला आणि संजयला मुलांना भेटण्याचा अधिकार दिला. घटस्फोटानंतर संजयने त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचे काम केले.

संजय कपूरने त्याच्या दोन्ही मुलांसाठी कोट्यवधी रुपयांचे बाँड खरेदी केले होते, ज्यावर त्याला दरमहा लाखो रुपयांचे व्याज मिळते. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, करिश्मा कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने त्याच्या दोन्ही मुलांसह समयारा आणि कियानसाठी १४ कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते. या बाँडवर त्याला दरमहा १० लाख रुपयांचे व्याज मिळते. संजयने करिश्माच्या नावावर मुंबईत एक घर देखील रजिस्टर केले होते, जे आधी त्याच्या वडिलांच्या नावावर होते.

संजय कपूरने केली तीन लग्नकरिश्मा कपूरशी लग्न करण्यापूर्वी संजय कपूरने फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर संजयने २००३ मध्ये करिश्माशी लग्न केले आणि त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले झाली. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी तिसरे लग्न केले. प्रियाला तिच्या पहिल्या लग्नापासून सफिरा ही मुलगी आहे, ज्याची जबाबदारी संजयनेही घेतली. याशिवाय संजय आणि प्रियाला अझारियस हा मुलगा आहे.

कसा झाला संजय कपूरचा मृत्यू?एएनआयने बिझनेस कन्सल्टंट सुहेल सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कपूर यूकेमध्ये पोलो सामना खेळत असताना त्याने एक मधमाशी गिळली. या मधमाशीने त्याच्या घशात चावा घेतला आणि त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :करिश्मा कपूर