Join us

करिश्मा आणि संदीप येतात एकाच गाडीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:48 IST

शशि कपूर यांच्या घरी झालेल्या बर्थ डे पार्टीच्या ठिकाणी ही दोघांना एकत्र बघितल्याचे बोलले जातेय. करिष्मा आणि संजय कपूरचा ...

शशि कपूर यांच्या घरी झालेल्या बर्थ डे पार्टीच्या ठिकाणी ही दोघांना एकत्र बघितल्याचे बोलले जातेय. करिष्मा आणि संजय कपूरचा घटस्फोटादरम्यान अनेकवेळा संदीप तिच्यासोबत कोर्टात येत असल्याचे बोलले जायचे. मात्र त्यांचा कोणताही फोटो त्यादरम्यान आलेला दिसला नाही. संदीपसोबत करिश्मा 'लिव्ह- इन-रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचेदेखील म्हटले जाते.मात्र त्या दोघांनी अजनूही हे नाते अधिकृत्यरित्या स्वीकारलेले नाही आहे. संदीप आणि करिश्मा एकाच घरात राहत असल्याचेही समजते आहे. कपूर खानदानने संदीपला आपला जावई म्हणून स्वीकारल्याच्याही चर्चा आहे. संजय आणि करिष्मा यांनी एकत्र 11 वर्ष संसार केला. संजय कपूर याचे डिझायनर नंदिता मोटवानीशी आधी लग्न झाले होते. नंदिताशी घटस्फोट झाल्यानंतर संजय आणि करिश्मा 2003 मध्ये विवाह केला. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत समायरा आणि कियानराज. घटस्फोटानंतर ही दोन्ही मुलं करिष्मा सोबत राहत आहेत. संजय सोबत लग्नाच्या आधी करिश्मा कपूरची अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला होता. संजयने करिश्माने आपल्याशी फक्त पैशांसाठी लग्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. तर करिश्माचा नवा बॉयफ्रेंड करिश्माशी लग्न करण्यासाठी  त्याची डॉक्टर पत्नी अश्रिता हिला मानसिक रुग्ण असल्याचे कारण कोर्टाiपुढे दिले आहे.  संदीप लवकरच त्याची डॉक्टर पत्नी अश्रिता हिला घटस्फोट देऊ शकतो. विशेष म्हणजे, संदीपने घटस्फोटासाठी आपली पत्नी मानसिक रूग्ण असल्याचे कारण दिले आहे. माझी पत्नी मानसिक रूग्ण आहे. यामुळे आमच्या नाते पुढे जाणे शक्य नाही, अशी सबब पुढे करून संदीपने घटस्फोट मागितला आहे.