करणने सोनाला केली या गोष्टीसाठी बंदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 17:35 IST
१९६९ मध्ये आलेला मर्डर मिस्ट्री ‘इत्तेफाक’मध्ये राजेश खन्ना आणि नंदा मुख्य भूमिकेत दिसले होते. याच चित्रपटाचा रिमेक येतोय आहे. ...
करणने सोनाला केली या गोष्टीसाठी बंदी!
१९६९ मध्ये आलेला मर्डर मिस्ट्री ‘इत्तेफाक’मध्ये राजेश खन्ना आणि नंदा मुख्य भूमिकेत दिसले होते. याच चित्रपटाचा रिमेक येतोय आहे. सोनाक्षी सिन्हा ‘इत्तेफाक’च्या रिमेकमध्ये फीमेल लीड म्हणून दिसणार आहे. सोनाक्षीसोबत या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागणार असल्याचीही खबर आहे. अर्थात सोना व सिद्धार्थ दोघेही आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार नाहीत. शाहरूख खानची ‘रेड चिलीज’ ही कंपनी, करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि बीआर फिल्म्स हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हे सांगायचे कारण म्हणजे, निर्माता करण जोहरने या चित्रपटासाठी सोनाक्षीवर एक बंदी घातली आहे. होय, ही बंदी कुठली तर, ओरिजनल चित्रपट न पाहण्याची. होय, ओरिजनल चित्रपट मुळीच पाहायचा नाही, अशी बंदी करणने सोनावर घातली आहे. जेणेकरून रिमेकमध्ये एक वेगळा फ्लेवर मिळेल. शेवटी सगळे काही चित्रपटासाठीच...नाही का?