Join us

करिना कपूरच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग 'मे'मध्ये होणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 16:50 IST

तैमुरच्या जन्मानंतर करिना कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पर्दापण करण्यास सज्ज झाली आहे. करिना तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग लवकरच ...

तैमुरच्या जन्मानंतर करिना कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पर्दापण करण्यास सज्ज झाली आहे. करिना तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु करणार असल्याचे कळतेय. गेल्या वर्षीच या चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात मात्र करिनाच्या प्रेग्नेंसीमुळे ते शक्य झाल नाही. शूटिंगच्या तारखा पुढे ढकलाव्या लागला. तैमूरच्या जन्मानंतर चित्रपटांपासून दूर राहिलेल्या करिनाच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त निघाला आहे. करिना मे महिन्यापासून वीरे दी वेडींग चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे.रंगून चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आलेल्या करिनाने सांगितले तिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडींगमध्ये एका हा हिरो नाही आहे मुख्य भूमिकेत चार ही अभिनेत्रीच आहेत. या चौघींची प्रत्येकाची आपली अशी वेगळी एक गोष्ट आहे. स्त्रीवादी चित्ररपटात काम करण्याचा आनंद करिनाच्या चेहऱ्यावर दिसत होता. या चित्रपटात सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तल्सानिआ आणि करिना कपूर यांच्या  मुख्य भूमिका आहेत. करिना यामध्ये आधुनिक मुलीच्या भूमिकेत असून सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.’ सोनमची बहिण रिहा कपूर या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. गेल्या वर्षांपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. मात्र करिनाच्या प्रेग्नेंसीमुळे या चित्रपटाचे शूटिंग रखडले. मात्र तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा एकदा करिना नव्या जोमाने काम करण्यास सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी करिनाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅमवर उतरुन  आपला जलवा दाखवला. प्रेग्नेंनसी दरम्यान ही करिनाने रॅमवर अवतरली होती.